पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग महागणपतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

17

पुणे : पुण्यातील मानाचा चौथा गणपती म्हणून ओळखला जाणारा तुळशीबाग महागणपती यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या निमित्ताने आयोजित तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

तुळशीबाग महागणपती हे पुण्याचे श्रद्धास्थान असून, यावर्षी मंडळाने गौरवशाली १२५ वर्षांच्या प्रवासात पदार्पण केले आहे. शिवाय, राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिल्याने यंदाच्या उत्सवात वैभव आणि आनंद अधिकच वाढेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

श्री तुळशीबाग गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा मानाचा चौथा गणपती आहे. या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली. १९७५ नंतर पहिल्या ग्लास फायबर पुतळ्याची स्थापना करण्याचा मान या मंडळाला आहे.

या प्रसंगी आमदार हेमंत रासने, श्रीकांत शेट्ये, सुनील महाजन, कृषणकुमार गोयल, अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, चकोर सुपेकर, अशोक हांडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.