भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष भूषण तुपे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पुणे : भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष भूषण तुपे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मनःपूर्वक अभिष्टचिंतन केले.
हडपसर व परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी हे कार्यालय प्रभावीपणे कार्यरत राहावे, अशी अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी आमदार योगेश टिळेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती आबा तुपे, मंडल अध्यक्ष संदीप लोणकर तसेच भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.