भाजप नेते राहुल शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूडमध्ये स्तुत्य उपक्रम … समाजातील गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे चालू राहावे – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : भाजप नेते राहुल शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड येथे सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांना व्हिलचेअर आणि गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून राहुल शेवाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
समाजातील गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे चालू राहावे, अशी अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
या वेळी मंत्रिमंडळातील दत्तात्रयमामा भरणे, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार राहुल कुल, योगेश टिळेकर, माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, भाजप नेते श्रीनाथ भिमाले, मंडल अध्यक्ष संदीप लोणकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.