उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे संदर्भातील आढावा बैठक संपन्न

मुंबई : मंत्रालय, मुंबई येथे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे संदर्भातील आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत विद्यापीठातील शैक्षणिक दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे तसेच शिक्षकेतर पदभरतीस मान्यता या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अध्यापकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्याबाबत, प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या संबंधित तसेच विद्यापीठातील पायाभूत सुविधा, बांधकामे, अनुदान आणि विद्यापीठाचे लेखा परीक्षण करण्याबाबत सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे व प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.