सांगली येथे भारतीय जनता पार्टीचा भव्य कार्यकर्ता मेळावा मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिती उत्साहाने संपन्न

11

सांगली : सांगली येथे भारतीय जनता पार्टीचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहाने संपन्न झाला. या मेळाव्यास उपस्थित राहून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ऊर्जा अनुभवण्याची संधी यानिमित्ताने मिळाली असल्याचे पाटील यांनी म्हटले.

या मेळाव्यास भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सत्यजित देशमुख, महामंत्री राजेश पांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक तसेच जनसुराज्य पक्षाचे सुमित कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील संघटन व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली.

आगामी काळ हा आपल्या सर्वांच्या नेतृत्व गुणांची परीक्षा पाहणारा असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्या सर्वांना एकत्रितपणे सामोरे जायचे आहे. पक्षाचे यश हे कोण्या एकाचे नसून, ते संघटनेचे यश असते. त्यामुळे आपल्या प्रत्येकाची भूमिका आणि कार्य निर्णायक असणार आहे. एकदिलाने व आतापासूनच यासाठी कार्यमग्न व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.