“विकसित भारत- विकसित महाराष्ट्र – विकसित सांगली !” अशा नाविन्यपूर्ण संकल्पाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वातंत्रदिनी शुभारंभ

सांगली : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा , सुशासन व गरीब कल्याण उद्दिष्ट गतिशील करण्यासाठी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र विकसित करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण सेवा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२. ३० वाजता जिल्हानियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या नाविन्यपूर्ण सेवा प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. पालकमंत्री कार्यालय (GMO) हेल्पलाईन सुरु करण्यात येत आहे. विकसित भारत- विकसित महाराष्ट्र – विकसित सांगली अशा नाविन्यपूर्ण संकल्पाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यावेळी शुभारंभ करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. सत्यजित देशमुख, आ. सदाशिव खोत, आ. गोपीचंद पडळकर, आ. इंद्रीस नायकवडी, आ. सुहास बाबर, भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यासोबतच सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हापरिषद – मुख्य कार्यकारी अधिकारी, तृप्ती घोडमिसे , सांगली महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
सदस्य नियोजन समिती – जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे आणि भाजपा उद्योग आघाडी माजी उपाध्यक्ष रमाकांत मालू या मान्यवरांचे मार्गदर्शन यावेळी उपस्थितांना लाभणार आहे. यासोबतच प्रदेशाध्यक्ष जनसुराज्य शक्ती समित कदम , सांगली शहराध्यक्ष प्रकाश ढंग, सांगली ग्रामीण अध्यक्ष सम्राट महाडिक , शिवसेना शहरप्रमुख महेंद्र चंडाळे , शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष ग्रामीण निशिकांत पाटील यासारख्या मान्यवरांचे देखील यावेळी मार्गदर्शन होणार आहे.
भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार, दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वाजता साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.