वीरमरण पत्करलेले लेफ्टनंट कर्नल प्रकाश बाबुराव पाटील यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

सांगली : सन १९९८ साली आसाममधील बोडो अतिरेक्यांविरुद्ध झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील बुधगावचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल प्रकाश बाबुराव पाटील यांनी शौर्याने लढत वीरमरण पत्करले. त्यांच्या स्मरणार्थ बुधगाव ग्रामपंचायत आणि लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद प्रकाश बाबुराव पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास शहीदांच्या मातोश्री आक्काताई बाबुराव पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार इद्रिस नायकवडी, माजी खासदार संजयकाका पाटील, भाजप नेते पृथ्वीराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य, माजी सैनिक तसेच बुधगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.