अपंग सेवा केंद्रातील कै. गंगाधर कुलकर्णी सभा मंडपाचे लोकार्पण तसेच विश्रामबाग येथील १०० फुटी रोडवरील चौकाचे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर चौक नामफलक अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

9

सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध उपक्रमांना भेटी दिल्या. तसेच सांगलीतील विविध उपक्रमांचे लोकार्पण देखील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान अपंग सेवा केंद्र, सांगली येथे उभारण्यात आलेल्या कै. गंगाधर कुलकर्णी सभा मंडपाचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सांगली विश्रामबाग येथील १०० फुटी रोडवरील चौकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर चौक करण्याचा महापालिकेचा ठराव मंजूर झाल्यानंतर, स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर नामफलक अनावरण करून लोकार्पण करण्यात आले.

अपंग सेवा केंद्र येथे दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनमोहक नृत्याविष्काराने मन भारावून गेले. त्यांचा उत्साह, कलागुण आणि आत्मविश्वास हा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, संजय कोटणीस महाराज, भाजप नेते तथा सांगली बॅंकेचे संचालक पृथ्वीराज पाटील, सौ. शोभा कुलकर्णी, अचल कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे विश्वस्त, शिक्षक, विद्यार्थी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

सांगली विश्रामबाग येथील १०० फुटी रोडवरील चौकाचे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर चौक नामफलक अनावरण प्रसंगी माजी मंत्री सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, भाजप नेते शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.