विधी महाविद्यालय आणि मानसशास्त्र संशोधन केंद्रामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि मानसशास्त्र संशोधनविषयक सुविधांचे नवे दालन खुले होईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृह या तिन्ही उपक्रमांच्या उद्घाटन आणि प्रारंभोत्सवाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमांमुळे शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा अधिक बळकट होईल, अशी खात्री असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमास माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जयंतराव पाटील, रोहित पवार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी समाजवादी विचारवंत व शेतकरी, वंचित, बहुजनांच्या हितासाठी सदैव कार्यतत्पर राहिलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच जयंतीनिमित्त माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर.आर. (आबा) पाटील यांच्या स्मृतींना देखील अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी समयोचित विचार व्यक्त केले. विधी महाविद्यालय आणि मानसशास्त्र संशोधन केंद्रामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि मानसशास्त्र संशोधनविषयक सुविधांचे नवे दालन खुले होईल, असा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले.
ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुवर्णसंधी, मानसिक आरोग्य क्षेत्रात संशोधनाची नवी दिशा आणि सामाजिक जाअसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. डॉ. एन. डी. पाटील यांची साधी रहाणी, संघर्षशील वृत्ती आणि समाजाभिमुख कार्य हा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठेवा आहे. त्यांचे विचार, तत्त्वे आणि वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपण सर्वांनी नेटानं पार पाडली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.