ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन… त्यांच्या निधनाने मराठी कलाक्षेत्रातील एक वडीलधारे व्यक्तिमत्व हरपले – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

5

पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन. दीर्घकाळ आजाराशी झुंज देत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या त्या आई. ज्योती चांदेकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’ ही शेवटची मालिका ठरली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपट सृष्टीतून तसेच राजकीय वर्तुळातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, ज्योती चांदेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने मराठी कलाक्षेत्रातील एक वडीलधारे व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांचा सहजसुंदर अभिनय, आणि कलाप्रेम हे मराठी कलाक्षेत्रासाठी कायमच प्रेरणादायी ठरेल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो!, अशी भावनिक प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

ज्योती चांदेकर यांनी अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं होतं. ज्योती चांदेकर यांनी अनेक मालिका, नाटक आणि सिनेमात भूमिका निभावल्या होत्या. त्यांनी साकारलेली मी सिंधुताई सपकाळ या सिनेमातील सिंधुताईंची भूमिका चांगलीच गाजली. केवळ बारा वर्षांच्या वयात त्यांनी अभिनयाची सुरुवात केली आणि तब्बल पाच दशकांहून अधिक काळ त्या या क्षेत्रात सक्रीय राहिल्या. गुरू, ढोलकी, तिचा उंबरठा, पाऊलवाट, सलाम, सांजपर्व यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तू सौभाग्यवती हो आणि छत्रीवाली या मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या मनात त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला.

Get real time updates directly on you device, subscribe now.