कोथरूड येथे सुरु केलेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त “धान्य महोत्सवा”चे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पुणे : कोथरूड येथे सुरु केलेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त “धान्य महोत्सवा”चे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. गेल्या वर्षभरात या उपक्रमाचा लाभ कोथरुड मधील हजारो नागरिकांना झाला असून सुमारे ११,००० पेक्षा जास्त कलाकार, दिव्यांगजन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वस्त व दर्जेदार धान्य उपलब्ध झाले आहे. या माध्यमातून उपक्रमाचा उद्देश यशस्वी होत असल्याचे पाटील यांनी म्हटले.
या दोन दिवसांच्या धान्य महोत्सवात समुत्कर्ष कार्डधारकांना ३०% सवलत,सर्वसामान्य नागरिकांना १५% सवलत दरात धान्य उपलब्ध करून दिले आहे. तसेच, महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीचीही व्यवस्था करण्यात आली असून, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाला भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, कुलदीप सावळेकर, सचिन पाषाणकर, समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वनिता काळे, शशिकला मेंगडे, कल्पना पुरंदरे, मधुरा वैशंपायन, धनंजय रसाळ, पार्थ मटकरी तसेच सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.