युवा सुराज्य प्रतिष्ठान संचलित नामदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या पोळीभाजी केंद्राचा शुभारंभ संपन्न

9

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आजपासून कोथरुड परिसरातील गरजू नागरिकांसाठी नाममात्र दरात पोळीभाजी केंद्र सुरु करण्यात आले आहे. युवा सुराज्य प्रतिष्ठान संचलित नामदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाचा आज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, एकात्म मानववादाचे प्रणेते व आमचे मार्गदर्शक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय संस्कृतीत केवळ समानतेच्या नव्हे, तर आत्मीयतेच्या पायावर व्यक्ती आणि राष्ट्राचा विचार मांडला. “अंत्योदय”चा मंत्र देताना त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला समाधानी करणं हेच खऱ्या अर्थाने सेवा असल्याचं सांगितलं. स्वामी विवेकानंदांनी देखील शेवटच्या घटकाच्या हितालाच प्राधान्य देण्याचा संदेश दिला. या विचारसरणीतून प्रेरणा घेत, समाजातील प्रत्येक गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी भाजप नेते पुनीत जोशी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी नगरसेविका ॲड. वासंती जाधव, हर्षाली माथवड तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.