श्री संत सेना महाराज पुणे राहत न्हावी समाज मंडळ व नाभिक समाज नवचैतन्य संघ यांच्या वतीने आयोजित कीर्तन व महाप्रसाद सेवा कार्यक्रमास नामदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून केले अभिवादन

पुणे : संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील श्री संत सेना महाराज पुणे राहत न्हावी समाज मंडळ व नाभिक समाज नवचैतन्य संघ यांच्या वतीने आयोजित कीर्तन व महाप्रसाद सेवा कार्यक्रमास पाटील यांनी उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कीर्तन सेवेच्या माध्यमातून हरिनामाचा दिव्य अनुभव घेतला आणि भक्तिरसात सहभागी झाले.
या प्रसंगी भाजप दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, पुणे शहर चिटणीस विठ्ठल बराटे, प्रशांत हरसुले तसेच समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेना महाराज हे एक वारकरी संप्रदायातील संत असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जातात. मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत होते. सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही भक्तिरसाची उपासना केलेली आढळते.