ज्ञान, संघटनकौशल्य आणि समाजभान या सर्वांचा संगम असलेली प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांची कार्यशैली आजच्या पिढीसाठी आदर्शवत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी नुकतेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.
चंद्रकांत पाटील यांनी प्रा. देशपांडे यांना उत्तम आरोग्य, दीर्घ आणि समृद्ध आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
या भेटीत विद्यार्थी परिषद काळातील अनेक सुवर्ण आठवणींना उजाळा मिळाला. ज्ञान, संघटनकौशल्य आणि समाजभान या सर्वांचा संगम असलेली त्यांची कार्यशैली आजच्या पिढीसाठी आदर्शवत असल्याचे पाटील यांनी म्हटले.