मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित छत्तीसगड मधील नक्षली आव्हानावर मात:धोरण-दृष्टी आणि अंमलबजावणी विशेष व्याख्यानाचे आयोजन

पुणे : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने “छत्तीसगडमधील नक्षली आव्हानांवर मात – धोरण, दृष्टी आणि अंमलबजावणी” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री श्री. विजय शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे अध्यक्षस्थानी होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना चंद्रकांत पाटील यांनी , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवाद निर्मूलनासाठी राज्यात हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना, जनसुरक्षा विधेयकाद्वारे शहरी नक्षलवादावरील निर्णायक कारवाई आणि गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्र विस्ताराच्या उपक्रमांची माहिती मांडली.
कार्यक्रमास रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, भाजप प्रदेश कार्यालयीन प्रमुख रवी अनासपुरे, सुधीर मेहता, श्रीकांत बडवे, एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.