कोथरुड मतदारसंघातील शिक्षकनगर येथे सुरू झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळाच्या वासा पूजन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पुणे : कोथरुड मतदारसंघातील शिक्षकनगर येथे सुरू झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळाच्या वासा पूजन कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून वासापूजन केले व मंडळाच्या पहिल्या वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
मंडळाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देताना चंद्रकांत पाटील म्हणाले , हे मंडळ भागातील किमान १० हजार नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारे केंद्रबिंदू व्हावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी भाजप पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुचितमंत देशपांडे, श्रीधर मोहोळ, नवनाथ जाधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.