उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यातील १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत आढावा बैठक संपन्न

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यातील १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ व्हिजन डॉक्युमेंट तयार करणे, ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पारदर्शक प्रशासन आणि भविष्यकालीन धोरणात्मक दृष्टीकोन यावर भर देण्यात आला असल्याचे पाटील यांनी म्हटले.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे संचालक किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसचिव संतोष खोरगडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.