गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मूळगाव कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी, खानापूर येथे गणरायाचे मोठ्या उत्साहात व थाटामाटात आगमन

कोल्हापूर : गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मूळगाव कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी, खानापूर येथे गणरायाचे मोठ्या उत्साहात व थाटामाटात आगमन झाले. यावेळी उपस्थित राहून चंद्रकांत पाटील यांनी सपत्निक गणरायांची मनोभावे पूजा-अर्चा केली आणि गावकऱ्यांसोबत गणेशोत्सवाचा आनंद साजरा केला.
दरम्यान गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे कोल्हापूर अध्यक्ष विजय जाधव यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्रींचे सहपत्निक दर्शन घेतले आणि जाधव कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच कोल्हापूरमधील अवनी संस्थेत विराजमान गणरायांचे दर्शन घेऊन सपत्नीक मनोभावे पूजा केली.
या पावन प्रसंगी पाटील यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात मंगलता, सुख-समृद्धी आणि सौख्य नांदो, अशी प्रार्थना गणरायाचरणी केली.