नामदार चंद्रकांत पाटील आणि मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच, माध्यमिक विद्यालय, महाळुंगे येथील शालेय मुलींना सॅनिटरी पॅड्स वाटप

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि मंडल अध्यक्ष लहू अण्णा बालवडकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच, जागृती विचारे यांच्या सहकार्याने माध्यमिक विद्यालय, महाळुंगे येथील शालेय मुलींना सॅनिटरी पॅड्स वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
मुलींच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने केलेला हा उपक्रम निश्चितच त्यांच्या आत्मविश्वास वृद्धीस हातभार लावणारा ठरेल, असे मत यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
या उपक्रमात मा. नगरसेविका सौ. ज्योतीताई कळमकर, स्वप्नाली ताई सायकर, महिला मोर्चा अध्यक्षा वैदेही ताई बापट, सांस्कृतिक आघाडी अध्यक्षा प्राजक्ता ताई देवस्थळी व महिला मोर्चा पदाधिकारी मौसमी ताई बकोरे यांची उपस्थिती लाभली.