कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक घेतले गणरायाचे दर्शन

20

पुणे : पुण्यात सर्वत्र गणेशोत्सव दिमाखात साजरा होत आहे. विविध देखावे साकारण्यात आले आहेत. यंदा ऑपरेशन सिंदूर, अयोध्या राम मंदिर, सामाजिक संदेश देणारे देखावे पुण्यात साकारण्यात आले आहेत. कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील ग्रामस्थांचे समस्त गावकरी मंडळ यांनी यावर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक या मंडळाच्या गणपतींचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली तसेच सर्वांच्या सुख आणि समृद्धीसाठी मंगल प्रार्थना केली.

यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे देखील उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.