कोथरुडकरांची जिद्द, चिकाटी आणि गणेशोत्सवाबद्दलचा उत्साहच खरी ऊर्जा देणारा – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : गणेशोत्सवाच्या आनंदात भर घालण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील विविध सोसायट्यांमध्ये नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या दिवसाचे कार्यक्रम गुरुवारी कोथरूड नागरिकांच्या सहभागाने यशस्वीरीत्या संपन्न झाला.
चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या , या सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यान वरुणराजाचीही अवेळी हजेरी लागली. मात्र, पावसाच्या जोरदार सरींनाही कोथरुडकरांच्या उत्साहाने हरवले. भर पावसातही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी दिलेली उत्स्फूर्त दाद पाहून मनापासून आनंद वाटला, असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली.
तुमची जिद्द, चिकाटी आणि गणेशोत्सवाबद्दलचा उत्साहच या कार्यक्रमांना खरी ऊर्जा देणारा असल्याचे म्हणत पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.