मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यादरम्यान भाजप पदधकाऱ्यांच्या निवासस्थानी विराजमान गणपतींचे घेतले दर्शन

सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आज सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले .
चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यादरम्यान जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, मिरजेतील हिंदुत्ववादी कार्यकर्ते, शिवप्रतिष्ठानचे मिरज नगर कार्यवाह, शिवप्रतिष्ठान गोरक्षण समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष विनायक माईणकर, भाजपा सांगली शहर उत्तर मंडल अध्यक्ष अमित देसाई, दैनिक जनप्रवासच्या मुख्यालयात विराजमान गणपती, भाजपा सांगली शहर उपाध्यक्ष प्रदीप पाटील, भाजपा सांगली शहर पश्चिम मंडल अध्यक्ष रविंद्र वादवणे, सांगलीतील प्रसिद्ध व्यापारी सदाशिव खिचडे, सांगलीतील पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्या घरी भेट दिली आणि गणरायाचे आशीर्वाद घेतले.
यावेळी माजी मंत्री तथा मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे, आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्यासह भाजपचे सर्व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. सर्वत्र पाटील यांचे स्वागत आणि आदरातिथ्य करण्यात आले.