मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचा शारदा गणेश आणि पुण्यातील श्रीमंत भाऊ रंगारी मंडळाच्या गणपतीचे घेतले दर्शन

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पाच मानाच्या गणपतींसोबत श्रीमंत दगडूशेठ गणपती, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचा शारदा गणेश आणि पुण्यातील श्रीमंत भाऊ रंगारी मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. गणराज्याच्या चरणी नतमस्तक होऊन यावेळी पाटील यांनी मनोभावे आरती केली. यावेळी सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, समाजात ऐक्य व सद्भावना वृद्धिंगत होवो, अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.
पुण्यातील श्रीमंत भाऊ रंगारी या मंडळाने यंदा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. पर्यावरणपूरक आणि शांततेत होणाऱ्या या उपक्रमाचे पाटील यांनी मनःपूर्वक कौतुक केले. मंडळाचे अध्यक्ष श्री. पुनीत बालन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
पुण्यनगरीतील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचा शारदा गणेश यांचे दर्शन घेतले. पुण्यातील गणेशोत्सव हा फक्त उत्सव नसून पुणेकरांच्या श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा उत्सव आहे. भक्तीभाव आणि उत्साहाने नटलेल्या या सोहळ्याने संपूर्ण शहर मंगलमय झाले असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली. पुणेकरांवर विघ्नहर्त्याची अशीच कृपादृष्टी राहो आणि सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो अशी मनोकामना पाटील यांनी व्यक्त केली.