पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न

पुणे : पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी करावा, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
सीओईपीने दिलेल्या संधींचे सोनं करून जागतिक स्तरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे, लवकरच नवी मुंबईत सीओईपीची दुसरी शाखा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची घोषणाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.
या सोहळ्यास टाटा ॲटोकॉम्प सिस्टिम लिमिटेडचे उपाध्यक्ष अरविंद गोयल, सीओईपी नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू प्रा. सुनील भिरुड, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. यशोधन हरिभक्त तसेच प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.