जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ‘श्रीं’ची आरती

सांगली : उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजला येथे स्थापना करण्यात आलेल्या श्री गणेश मूर्तीचे पूजन करून आरती केली.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जयश्री पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री पाटील यांना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगलीचे आराध्य दैवत श्री गणेशाची प्रतिमा भेट दिली.