संस्था केवळ अध्यापनापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, कौशल्यविकास आणि समाजाभिमुखता निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील, अशी अपेक्षा – मंत्री चंद्रकांत पाटील

पंढरपूर : पंढरपूर येथे श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या स्वेरी लॉ कॉलेजची नवीन बहुउद्देशीय इमारत, क्रीडांगणाचे लोकार्पण तसेच मुलींसाठीच्या चौथ्या ९ मजली वसतिगृहाच्या पायाभरणी सोहळा रविवारी संपन्न झाला. या सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
हि संस्था केवळ अध्यापनापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, कौशल्यविकास आणि समाजाभिमुखता निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील, अशी अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
या सोहळ्याला ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे, आ. समाधान आवताडे, अभिजीत पाटील, बाळासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार, संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. बी. पी. रोंगे, सचिव प्रा. डॉ. सुरज रोंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतनाना देशमुख, बार कौन्सिलचे ॲड. भोसले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.