समुत्कर्ष ग्राहक पेठेची दुसरी शाखा शिवाजीनगर भागात सुरु… मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

पुणे : “Money save is Money earned” या उक्तीनुसार, गरीब आणि गरजू कुटुंबाना हातभार लाभावा; या हेतूने सुरु केलेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेची दुसरी शाखा शिवाजीनगर भागात सुरु करण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते या शाखेचे उदघाटन करण्यात आले.
या चळवळीमुळे सर्वसामान्यांची सेवा करण्याचे समाधान लाभत असून, त्यांचा विश्वास आणि पाठिंबा, हीच आमची खरी ताकद असल्याच्या भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. सेवेच्या या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.
आजच्या कार्यक्रमाला भाजपा पुणे शहर सरचिटणीस रवी साळेगावकर, सुनील पांडे, अपर्णा कुऱ्हाडे, राजेश राठोड, पार्थ मटकरी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.