उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

मुंबई : मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत विद्यापीठातील प्राध्यापक पदभरती प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गुणवत्तापूर्ण व सक्षम मनुष्यबळ विद्यापीठात उपलब्ध व्हावे यासाठी ही प्रक्रिया ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.