मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या भरत गितेंचा प्रेरणादायी प्रवास खऱ्या अर्थाने तरुणांसाठी एक दीपस्तंभ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील नंदगौल या गावचे भरत गिते यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील नंदगौल या छोट्याशा गावातून आलेले भरत गिते यांनी आपल्या मेहनत, चिकाटी आणि दूरदृष्टीच्या जोरावर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय स्थान निर्माण केले आहे. पुण्यातील COEP मधून इंजिनिअरिंग पूर्ण करून जर्मनीतून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मायदेशी परत येत केवळ १० सहकाऱ्यांसह G&B Metal Casting या उद्योगाची स्थापना केली. आज अवघ्या दहा वर्षांत हा उद्योग ५०० कोटींच्या घरात पोहोचला आहे ही त्यांच्या दूरदृष्टीची आणि परिश्रमाची साक्ष आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी झालेल्या अनौपचारिक संवादात त्यांच्या संघर्षमय आणि यशस्वी प्रवासाची सविस्तर माहिती घेण्याची संधी मिळाली. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या भरत गितेंचा हा प्रेरणादायी प्रवास खऱ्या अर्थाने तरुणांसाठी एक दीपस्तंभ असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.