‘माझा विघ्नहर्ता, पर्यावरणाचा रक्षणकर्ता !’ उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

23

वाकड/ चिंचवड : चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा.शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्नेहा रणजित कलाटे यांच्या वतीने रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांनी पर्यावरणपूरक गणपती मूर्ती विसर्जनाला प्राधान्य द्यावे यासाठी ‘माझा विघ्नहर्ता, पर्यावरणाचा रक्षणकर्ता’ या विशेष अभियानाचे आयोजन प्रभाग क्रमांक २६ वाकड, कस्पटे वस्ती, विशालनगर, जगताप डेअरी, पिंपळे निलख या परिसरात करण्यात आले होते. या अभियानांतर्गत प्रभागातील विविध ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन हौदाच्या ठिकाणी फाउंडेशनच्या स्वयंसेवकांमार्फत नागरिकांना पर्यावरणपूरक विसर्जनाचे महत्व सांगण्यात आले. यासोबतच त्यास प्रतिसाद देणाऱ्या प्रभागातील तब्बल तीन हजार पाचशेहून अधिक कुटुंबियांचा फाउंडेशनच्या वतीने प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान देखील करण्यात आला.

वाकड, कस्पटे वस्ती, विशालनगर, जगताप डेअरी, पिंपळे निलख परिसरातील नागरिक हे पर्यावरण प्रेमी आहेत. या आधी देखील आम्ही आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रम किंवा मतदानाच्या दिनी वृक्ष रोप वाटप कार्यक्रम असेल अशा सर्व उपक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मोठया प्रमाणावर असतो. हा अभिनव उपक्रम आम्ही या गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबविला. या उपक्रमाला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद नक्कीच उत्साह वाढविणारा असल्याचे म्हणत फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा रणजित कलाटे यांनी सर्व नागरिकांचे तसेच ही सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे, कर्मचाऱ्यांचे परिसरातील गणपती विसर्जन हौदांना दिलेल्या भेटी दरम्यान आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित आबा कलाटे देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते. या उपक्रमास रणजीत आबा कलाटे फाउंडेशनचे सर्व स्वयंसेवक, पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Get real time updates directly on you device, subscribe now.