माजी आमदार जगदीश मुळीक यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित… उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न

21

पुणे : लंडन येथे झालेल्या दैनिक लोकमतच्या “लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कनव्हेन्शन” सोहळ्यात माजी आमदार जगदीश मुळीक यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्त वडगाव शेरी येथील नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला.हा नागरी सन्मान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते आणि जगद्गुरुकृपंकित ह.भ.प. डॉ चेतनानंद महाराज (पुणेकर) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जगदीश मुळीक यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कितीही मोठा पुरस्कार मिळाला त्यापेक्षा आपल्या लोकांकडून त्याबाबद्दल आपल्या पाठीवर मिळणारी कौतुकाची थाप ही अधिक आनंद आणि ऊर्जा देणारी असते.आज हजारो लोकांच्या उपस्थितीत हा सन्मान होत असताना हीच भावना माझीही आहे, असे मत मुळीक यांनी व्यक्त केले.

यावेळी स्थानिक आमदार बापूसाहेब पठारे, जगद्गुरुकृपांकित डॉ. चेतनानंद महाराज (पुणेकर), योगेश मुळीक, भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, अनिल नवले यांच्यासह इतर मान्यवर, भाजप पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.