नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या कोथरुड मतदार संघातील नागरिकांसाठी मोफत शटल बससेवेचा भव्य शुभारंभ

पुणे : पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या कोथरुड मतदार संघातील नागरिकांसाठी मोफत शटल बससेवेचा भव्य शुभारंभ रविवार दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वा. नळस्टॉप / SNDT मेट्रो स्थानक, कर्वे रोड, पुणे येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने संपन्न होणार आहे. यावेळी मा. श्रावण हर्डीकर भा.प्र.से., व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सकाळी ८.३० ते १ व सायं. ४ ते ८ या वेळेत राजाराम पूल – मावळे चौक तसेच विकास चौक – वनदेवी – कर्वेनगर चौक डहाणूकर चौक – कर्वे पुतळा -करिष्मा चौक – SNDT अशी ही सेवा उपलब्ध असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
ही सुविधा मेट्रो प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद करण्यासाठी आहे तरी सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहावे अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.