राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषद यांच्या वतीने “NAREDCO Pune Growth Conclave 2025” चे आयोजन पुण्यात… मंत्री चंद्रकांत पाटील यांची या परिषदेला प्रमुख उपस्थिती

14

पुणे, १२ सप्टेंबर : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषद (NAREDCO) यांच्या वतीने “NAREDCO Pune Growth Conclave 2025” चे आयोजन पुण्यात करण्यात आले. या परिषदेला आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुण्याच्या शाश्वत, सर्वसमावेशक आणि नियोजनबद्ध विकासासाठी महत्त्वपूर्ण चर्चा व विचारमंथन यावेळी करण्यात आले, असल्याची माहिती पाटील यांनी दिली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास नारेडकोचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, नारेडको पुणेचे भरत अग्रवाल, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ आणि मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.