छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील स्वच्छतादूत कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; डॉ. अजय दुधाणे यांचा पुढाकार

पुणे : छत्रपती शिवाजीनगर, विधानसभा म.संघाचे कार्यसम्राट आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा, छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे मा. सरचिटणीस डॉ. अजय दुधाणे यांच्या पुढाकाराने आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १२ छत्रपती शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी आयोजित सन्मान परिश्रम, समर्पण व जबाबदारीने काम करणाऱ्या, कर्तव्याप्रती निष्ठा असणाऱ्या स्वच्छतादूत कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आरोग्य कोठी, छत्रपती शिवाजीनगर गावठाण येथे पार पडला. प्रशस्तिपत्रक आणि भेटवस्तू देऊन या स्वच्छतादूतांचा गौरव यावेळी करण्यात आला.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. अजय दुधाणे म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकाचे आपण देणे लागतो. स्वच्छता कर्मचारी देखील त्यातील एक महत्वपूर्ण घटक आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचे गेली अनेक दिवस मनामध्ये होते. त्यातूनच हा कृतज्ञता सन्मान करण्याचं ठरवलं. समाजातील शेवटच्या घटकाच्या सेवेसाठी अविरत कार्य करण्याची अंत्योदयाची संकल्पना प्रामाणिकपणे राबविण्याचा हा एक प्रयत्न, असल्याचे दुधाणे यांनी म्हटले.
यावेळी घोले रोड क्षेत्रीय कार्यालय सहा. आयुक्त तिमया जंगले, तसेच डॉ. अजय दुधाने यांचे सहकारी छत्रपती शिवाजीनगर दक्षिण मंडल अध्यक्ष शैलेश बडदे, मंडल सरचिटणीस अपर्णाताई कुऱ्हाडे, प्रभाग १२ चे अध्यक्ष सुजीत गोटेकर तसेच सहआयोजिका सौ. मनीषा दुधाणे, आरोग्य निरीक्षक राहुल शेळके, आरोग्य निरीक्षक उदय सणस, मुकादम राजेंद्र गायकवाड, अमित शिंदे, सुबोध उत्तेकर, ऋषिकेश इंगळे, कृष्णा बताने आदी मान्यवर उपस्थित होते.