उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वारगेट मेट्रो स्थानकास भेट देऊन केली पाहणी

8

पुणे : स्वारगेट मेट्रो स्थानकास आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आणि स्थानकाच्या आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, स्वारगेट बस स्थानक हे पुण्यातील सर्वात व्यस्त बस स्थानक आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य नागरिक पुण्यात येण्यासाठी स्वारगेट बसस्थानकाचाच वापर करतात. यापूर्वी स्वारगेटला आलेला प्रवाशाला आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पीएमपीएमएल किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र, पुण्याच्या उदरात तयार झालेले मेट्रो स्टेशनला आताच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

येथे विविध वाहतूक सेवांचे एकत्रिकरण होणार आहे. त्यामुळे, आगामी काळात स्वारगेट मेट्रो स्थानक हे प्रवासासोबतच कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल हब देखील ठरेल, असा विश्वास या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ, संचलन व प्रणालीचे संचालक विनोदकुमार अग्रवाल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.