पाषाण मधील लोकसेवा पब्लिक स्कूलच्या वतीने डॉ. मोहनजी भागवत यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रांगोळी रेखाटून शुभेच्छा… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कलाकृतीबद्दल केले ऋण व्यक्त

पुणे : रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, कोथरुड मतदारसंघातील पाषाण मधील लोकसेवा पब्लिक स्कूलच्या वतीने मोहनजींची रांगोळी रेखाटून शुभेच्छा देण्यात आल्या. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी उपस्थित राहत सर्व कलाकारांचे कौतुक केले.
या रांगोळीमधून कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वबोध, नागरी शिष्टाचार, सामाजिक समरसता या पंचपरिवर्तनचा संदेश देण्यात आला आहे. ही रांगोळी रेखाटणाऱ्या कलाकारांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देताना संघाचा एक सामान्य स्वयंसेवक म्हणून या कलाकृतीबद्दल चंद्रकांत पाटील यांनी ऋण व्यक्त केले. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या रांगोळी रेखाटणाऱ्या सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार दीपकजी पायगुडे, राहुल कोकाटे, प्रल्हाद गवळी यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.