कोथरुड मतदारसंघातील बाणेरमधील राजयोग सोसायटीची २६ वी सर्वसाधारण सभा नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील बाणेरमधील राजयोग सोसायटीची २६ वी सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली. या सभेला चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सोसायटीच्या सर्व सभासदांशी संवाद साधला.
सीसीटीव्ही आणि सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. या दोन्ही मागण्या पूर्ण करण्यात यश आल्याने सोसायटीने चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सोसायटीच्या इतर समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील पाटील यांनी यावेळी दिली.
सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एस. एम. पवार यांच्यासह सर्व सभासद यावेळी उपस्थित होते.