कोथरूड मतदारसंघातील क्रिकेटप्रेमी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन… नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील क्रिकेटप्रेमी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाटील यांनी सर्व महिला खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. क्रिकेट सारख्या खेळात महिलांचा वाढता सहभाग हे महिलांच्या उत्साहाचे द्योतक आहे, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी स्पर्धेच्या संयोजिका तथा भाजपा कोथरुड दक्षिण मंडल महिला मोर्चा अध्यक्षा अमृता देवगावकर, भाजप दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, मध्य मंडल अध्यक्षा हर्षाली माथवड, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि महिला खेळाडू उपस्थित होते.