पुण्यात ‘ब्रह्मोद्योग स्टार्टअप कॅान्क्लेव २०२५’ चे आयोजन… ब्राह्मण समाजानेही उद्योजकतेला प्राधान्य देत नोकरी देणारे झाले पाहिजे – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (पिंपरी चिंचवड), उद्योजकता विकास आघाडी आणि ब्रह्मोद्योग फाऊंडेशनच्या वतीने ‘ब्रह्मोद्योग स्टार्टअप कॅान्क्लेव २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या.
आगामी काळात नोकरीपेक्षा उद्योजकतेला जास्त महत्त्व मिळणार आहे. कौशल्यावर आधारित उद्योजकतेला जास्त प्रोत्साहन मिळत आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला स्टार्टअप हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे, त्यामुळे ब्राह्मण समाजानेही उद्योजकतेला प्राधान्य देत नोकरी देणारे झाले पाहिजे, अशी भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे गोविंदराव कुलकर्णी, निखिल लातूरकर, त्रिविक्रम जोशी, सत्यजीत कुलकर्णी, माजी महापौर आर. एस कुमार, सचिन कुलकर्णी, अश्विन इनामदार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.