इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन…त्यांचे कार्य आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी – मंत्री चंद्रकांत पाटील

138

पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे वयाच्या 79 व्या वर्षी बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं पुण्यात निधन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवचरित्र संशोधन या विषयावर त्यांनी सखोल ग्रंथ आणि शोधनिबंध लिहिले. त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास व संदर्भ अनेक इतिहासवर्ग आणि अभ्यासक्रमांमध्ये घेतला जातो. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो! अत्यंत साधी राहणी, अस्सल दस्तऐवज आणि पुरावे हातात ठेऊन कमालीच्या संयत भाषेत इतिहासातील वास्तव सांगणारा महर्षी आज काळाच्या पडद्याआड गेला. इतिहासाचे संशोधन करणाऱ्या आणि त्यातील सत्य शोधणाऱ्या प्रत्येकाची ही व्यक्तिगत हानी आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. इतिहासाच्या अभ्यासासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा अभ्यास व लेखन करण्यासाठी त्यांचे योगदान अतुलनीय होते. त्यांचे कार्य आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केली.

गजानन भास्कर मेहेंदळे शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिशमध्ये खूप मोठे ग्रंथ लिहिले आहेत, जे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत. फारसी, मोडी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मराठी, तसेच फारसी/उर्दू व इतर भाषिक दस्तऐवजांचा अभ्यास. त्यांनी शास्त्रीय स्रोत आणि नकाशे, संदर्भसहित इतिहासगोष्टी मांडल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.