बाणेर मधील कै. बाबुराव बालवडकर प्राथमिक विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना नाचणी बिस्किट वाटप उपक्रमाचा शुभारंभ नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

पुणे : सेवा पंधरवड्याअंतर्गत आज बाणेर मधील कै. बाबुराव बालवडकर प्राथमिक विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना नाचणी बिस्किट वाटप उपक्रमाचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा; यासाठी नाचणीची बिस्किटे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. मुलांनी देखील आपल्या घरी नाचणीच्या पदार्थासाठी आग्रह धरावा, असा कानमंत्र यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच, कोथरुड मतदारसंघातील मुलांमध्ये पौष्टिक आहाराची गोडी लागावी यासाठी २२००० विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस नाचणीची बिस्किटे उपलब्ध करुन देण्याचा संकल्प यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षिका सुजाता वाघमारे, कल्पना बाबर, सुकेशनी मोरे, शोभा घोरपडे, भाजप कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजप नेते गणेश कळमकर, भाजप उत्तर मंडल माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजप नेते प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, अस्मिता करंदीकर, अनिकेत चांधेरे, वैदेही बापट, मृणाल गायकवाड, स्मृती जैन, निकीता माथाडे, जागृती विचारे, स्नेहल सुतार यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.