मंत्री चंदक्रांत पाटील यांनी नांदेड येथील अभंग पुस्तकालयाला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाची केली पाहणी

नांदेड : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंदक्रांत पाटील आज नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नांदेड येथील अभंग पुस्तकालयाला भेट दिली. दरम्यान नांदेड प्रवासादरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांची भेट देखील त्यांनी घेतली.
चंद्रकांत पाटील यांनी आज नांदेड दौऱ्यादरम्यान येथील देऊन अभंग पुस्तकालयाला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाची पाहणी केली. ग्रंथसंपदेतून उलगडणारी ज्ञानाची समृद्ध परंपरा अनुभवताना आनंद झाला.अशा प्रदर्शनांमुळे वाचनसंस्कृतीचा प्रसार होऊन समाजात प्रबोधनाचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित होईल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
नांदेड प्रवासादरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. या भेटीत कार्यकाळातील अनेक संस्मरणीय क्षणांची आठवण ताजी झाली आणि जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. विद्यार्थी परिषदेने दिलेल्या मूल्यांचा आणि संघटन कौशल्यांचा आजच्या कार्यातही खूप उपयोग होत असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.