सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, आर्टी आदी संस्थांच्या शिष्यवृत्तीसाठी संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीच्या शिष्टमंडाळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट

पुणे : सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, आर्टी आदी संस्थांच्या शिष्यवृत्तीसाठी संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीच्या वतीने डेक्कन चौकात आंदोलन सुरु असून; त्यावर मार्ग काढण्यासाठी समितीच्या शिष्टमंडाळाने आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
सकारात्मक चर्चेनंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन कृती समितीला यावेळी पाटील यांनी दिले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय समन्वय कृती समितीने घेतला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून मंत्रालयात मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याबाबत पाटील यांनी चर्चा झाली.
यावेळी युवासेना नेते किरण साळी, नितीन आंधळे, पूजा झोळे, विद्यार्थी भारत पवार, अंकुश चौगुले, परिमल कुंभार, अभाविपचे राधेय बाहेगव्हाणकर, अलोक पवार, सई थोपटे आदी विद्यार्थी उपस्थित होते.