पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त कोथरूड भागात भव्य वॉकेथॉनचे आयोजन… नामदार चंद्रकांत पाटील यांनी वॅाकेथॅानला केले मार्गस्थ

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “सेवा पंधरवडा” अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील भाजपा मध्य मंडल सरचिटणीस अमित तोरडमल यांच्या संयोजनातून ‘स्वच्छ कोथरुड, स्वस्थ कोथरुड’चा संदेश घेऊन वॅाकेथॅानचे आयोजन केले . चंद्रकांत पाटील यांनी आज या वॅाकेथॅानला मार्गस्थ करुन सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहित केले. तसेच, या वॅाकेथॅानमध्ये सहभागी होऊन मॅार्निंग वॅाकचा आनंद देखील लुटला.
मोदीजी हे स्वच्छता आणि आरोग्याबाबत नेहमीच जागरुक असतात. उत्तम आरोग्यासाठी त्यांचा व्यायामावर विशेष भर असतो. उत्तम आरोग्यासोबतच परिसर स्वच्छतेला सर्वांनी प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.
स्वच्छ कोथरूड – स्वस्त कोथरूड या संकल्पनेला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला व सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमांतर्गत स्वच्छते साठी सर्वांनी एकत्र येऊन “आपला भाग स्वच्छ ठेवूया” ही शपथ घेतली आणि स्वच्छतेचा संकल्प दृढ केला.
मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतभर सुरू असलेल्या “सेवा पंधरवडा” उपक्रमांतर्गत लोकहिताचे विविध कार्यक्रम पार पडत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोथरूडमध्ये ही वॉकेथॉन घेण्यात आली.
यावेळी संयोजिका श्वेता तोरडमल, भाजपा मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, पुणे शहर उपाध्यक्ष विठ्ठलआण्णा बराटे, शहर चिटणीस प्रा. डॉ. अनुराधा एडके, सरचिटणीस सचिन मोकाटे, महेश शिंदे, वैभव मुरकुटे, मध्य मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हर्षाली माथवड, गणेश वर्पे, प्रभाग अध्यक्ष प्रदीप जोरी, अभिजीत मुळे, स्वप्नील राजवाडे, दीपक पवार, बाळासाहेब टेमकर, अनिता तलाठी, जान्हवी जोशी, सुजीत मगर, राज तांबोळी, रुपेश भोसले, नाना कुंबरे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.