विचारवंतांचा संवाद मेळाव्यातून मोदीजींच्या कार्यप्रणालीतील मूल्ये, दृष्टिकोन आणि विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, महानगर नांदेड यांच्या वतीने ‘विचारवंतांचा संवाद मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन विचारवंतांशी संवाद साधला.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, मोदीजींचे नेतृत्व हे समाजातील प्रत्येक घटकाला दिशा देणारे ठरले आहे. ‘सर्वांसाठी विकास, सर्वांचा सहभाग’ या तत्वावर आधारित त्यांची कार्यशैली आज जगभरात प्रेरणादायी ठरत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या संवाद मेळाव्यातून मोदीजींच्या कार्यप्रणालीतील मूल्ये, दृष्टिकोन आणि विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला, असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
या मेळाव्यास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण, राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, भाजप विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.