पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा नेते सुशील मेंगडे यांच्या संयोजनातून “विकसित भारत भव्य चित्रकला स्पर्धेचे” आयोजन… नामदार चंद्रकांत पाटील यांनी स्पर्धेस भेट देऊन दिल्या शुभेच्छा

22

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा नेते सुशील मेंगडे यांच्या संयोजनातून बाळगोपाळांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि भावी पिढीच्या मनातील विकसित भारताचे चित्र स्पष्ट व्हावे यासाठी, “विकसित भारत भव्य चित्रकला स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

लहान मुलांनी मोदीजींचा जीवनातील क्षणावर आधारित रेखाटलेली चित्रं पाहून थक्क झालो. माननीय मोदीजींचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होताना, भावी पिढीच्या हातात भारत सुरक्षित आणि आत्मनिर्भर असेल, असा विश्वास वाटत असल्याच्या भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमास संयोजक सुशील मेंगडे, भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, प्रभाग अध्यक्ष राजीवजी नारायण मोरे , दाभाडे काका, गौरव खैरनार, निलेश खत्री, उमंग भोसले, विशाल रामदासी, सतीश सुतार, सुधीर मोहिते, संतोष बराटे, अजिंक्य साळुंखे, सोहम चौधरी, गंगाधर भगत, सतीश झंजाड, आदित्य बराटे, शैलेश मेंगडे, गणेश गायकवाड, सप्रे काका, परमेश्वर माने, आबा पाटील, हरीश सोनवणे, आशिष जुनैद, अनिकेत राऊत आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.