‘युगप्रवर्तक नरेंद्र-७५ वर्षांची समर्पित जीवन कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष पूजनीय गोविंदगिरीजी महाराज आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

पुणे : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनावर विनायक आंबेकर लिखित ‘युगप्रवर्तक नरेंद्र-७५ वर्षांची समर्पित जीवन कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष पूजनीय गोविंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाले. यावेळी पुस्तकाला शुभेच्छा देताना नरेंद्र मोदीजींचा मिळालेला स्नेह आणि आठवणींना पाटील यांनी उजाळा दिला.
सन १९८० मध्ये विद्यार्थी परिषदेसाठी दोन वर्ष पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विद्यार्थी परिषदेचे १३ वर्षे काम केले. याकाळात गुजरातची जबाबदारी मिळाल्यानंतर माननीय मोदीजींचा अतिशय जवळून स्नेह मिळाला. त्यांच्या व्यक्तीमत्वामुळे आजही कामाची ऊर्जा मिळते, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, गोखले इन्स्टिट्युटचे उमाकांत दास व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.