मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोर समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

पुणे : ढोर समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले.
यावेळी माजी नगरसेवक किरण दगडे-पाटील, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, भाजपा कोथरुड मतदारसंघ संयोजक नवनाथ जाधव, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम इंगोले, रायभान बोराडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामभाऊ बोराडे, बाळासाहेब लासुरे, अशोक बोराडे, अविनाश लासुरे, नंदू सकपाळ, विष्णू लासुरे, ताराचंद बोराडे यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते.