कोथरूडमध्ये अप्रतिम कलाकृती सादर करून रंगत आणणाऱ्या सर्व कलाकारांचा स्नेहमेळावा नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती उत्साहात संपन्न

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात विविध उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सव काळात देखील विविध उपक्रम राबविण्यात आले होते. नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. गणेशोत्सवाचा उत्साह आणि आनंद द्विगुणित करण्यासाठी कोथरुड मतदारसंघातील विविध सोसायट्यांमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांना कोथरुडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमांमध्ये अप्रतिम कलाकृती सादर करून रंगत आणणाऱ्या सर्व कलाकारांचा आज चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्नेहमेळावा आनंदी वातावरणात पार पडला.
तरुण वयात “अभिनव” नावाच्या कलाकारांच्या ग्रुपचा प्रमुख म्हणून कार्य करण्याचा अनुभव असल्यामुळे, या कलाकारांच्या आनंदसोहळ्यात सहभागी होताना मलाही एक वेगळे समाधान आणि आनंद मिळाला, असल्याच्या भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केल्या. यावेळी विविध कलागुण सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचा सर्वानी आनंद घेतला.
यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.