नामदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील वाघजाई माता मंदिर, नवयुग मित्रमंडळ येथील देवीचे दर्शन घेऊन सर्वांच्या उत्तम आरोग्य व सर्वांगीण प्रगतीसाठी केली प्रार्थना

पुणे : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील बालेवाडी येथील वाघजाई माता मंदिर, नवयुग मित्रमंडळ येथील देवीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजाअर्चा केली. तसेच कोथरूडमधील मोरेश्वर बालवडकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या दुर्गामातेचे देखील दर्शन घेतले.
चंद्रकांत पाटील यांनी पुणे दौऱ्यादरम्यान कोथरुड मतदारसंघातील बालेवाडी येथील वाघजाई माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आई वाघजाईच्या चरणी कोथरूडकरांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य व सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी प्रार्थना केली. या पावन पर्वाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि ऐक्य नांदो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच कोथरूड येथील नवयुग मित्रमंडळाच्या देवीचे देखील त्यांनी दर्शन घेऊन मनोभावे पूजाअर्चा केली.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरूडमधील भाजप (उत्तर)कोथरूड विधानसभा सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या दुर्गामातेचे चंद्रकांत पाटील यांनी दर्शन घेतले. यावेळी बालवडकर कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.